श्री. गणेश बबन लांडगे
अध्यक्ष
पिं. चिं. एज्यु ट्रस्ट या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या छत्र छायेत नोकरी माध्यमातून कार्यरत असताना पिं. चिं. एज्यु ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये सभासद म्हणून सहभागी झालो . पतसंस्था स्थापनेपासून (१९९६ ) ते आजपर्यंत सर्वच सभासदांच्या आर्थिक गरजा व तेही वारंवार पूर्ण होत आलेल्या आहेत याचे अनेक जण साक्षीदार आहेत . या पतसंस्थेच्या पतपुरवठ्याचा लाभ घेऊन सभासदांनी त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे . अशा प्रकारे पतसंस्थेचा सिंहाचा वाटा आहे . त्यामुळेच हि पतसंस्था सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे .
कालांतराने सर्व सभासच्या सहकार्याने माझी निवड पतसंस्था संचालक कार्यकार्यात झाली तदनंतर संचालक सदस्यांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी माझी निवड करून कार्य व सेवा करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली . या अशा आर्थिक कामधेनू असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्ष पदाचा बहुमान दिल्याबद्दल सर्व सभासद व संचालक मंडळाचे मनः पूर्वक आभार व्यक्त करतो . तसेच सर्व सभासद , सर्व संचालक पदाधिकारी यांच्या ऋणात राहून पतसंस्थेची आर्थिक वाढ व शिस्त यान साठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देतो .
पतसंस्थेचा कारभार करत असताना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री . ज्ञानेश्वरजी लांडगे , उपाध्यक्ष मा. पद्माताई भोसले , सचिव श्री. व्ही . एस . काळभोर, खजिनदार मा. एस. डी. गराडे , मा. हर्षवर्धन पाटील या सर्व मान्यवरांचे आशीर्वाद काम करण्यास प्रेरणा देत असतात. पतसंस्थेच्या माध्यमातून शेअर्स दाखले वाटप , लाभांश , गुणवंत पाल्यांचा सत्कार , कार्यक्रमात ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्थांची उपस्थिती व मार्गदर्शन आम्हांस चांगले कार्य करण्यास सदैव प्रेरित करते .पतसंस्थेच्या वतीने आदरणीय ट्रस्ट प्रती ऋण व कृतज्ञता व्यक्त करतो . पतसंस्थेला कायम व सर्वतोपरी मदत करण्यासाठी अग्रस्थानी ट्रस्ट एक्जहु डायरेक्टर मा. श्री . डॉ गिरीश देसाई , पतसंस्था सल्लागार सौ डॉ व्ही एस ब्याकॉड व सल्लागार प्रा डॉ एच . यु. तिवारी, सल्लागार प्रा सौ ए आर कामठे डायरेक्टर डॉ जी एन कुलकर्णी , पतसंस्था मा. अध्यक्ष एम एम काळभोर या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनः स्व आभार ... जवळ पास ३७० सभासद संख्या असलेल्या पतसंस्थेचे कार्य व प्रगती अतिशय विश्वासाने पेलणारे विश्वस्त मंडळातील माझे सहकारी , उपाध्यक्ष , सचिव , खजिनदार,सहसचिव व सर्व सदस्य यांचे योगदान अनमोल आहे.
संचालक मंडळाला या कार्यात ऑफिसमध्ये कार्य सांभाळणाऱ्या सौ. पूर्व समुद्र यांच्या तत्पर सहकार्य सहकार्याचा उल्लेख आवर्जून करावा लगेल . पतसंस्थेच्या कार्यास संचालक मंडळ लक्ष देत असते. पत्र व्यवहार, पारदर्शकता , आर्थिक व्यवहार हिशोब पत्रके, सर्व प्रकारच्या नोंदीचे रजिस्टर, कर्ज परत फेड व वर्गणी कपात , लाभांश वाटप इत्यादी , तसेच कर्ज रक्कमेस विमा संरक्षण , दिवाळी भेट वस्तू / स्वीट वाटप या सर्व बाबींच्या नियोजन साठी सर्व जण तत्पर व दक्ष असतात सर्व पदाधिकारी यशस्वीपणे जबाबदारी पार पडून प्रगतीत अनमोल योगदान देतात.
पुनः श्च एकदा या सर्वांचे मनः पूर्वक आभार .....
श्री. सुनिल उत्तम गायकवाड
उपाध्यक्ष
नमस्कार ..
जुने २०१८ रोजी पतसंस्थेच्या निवडणुकी द्वारे विद्यमान कार्यकारी मंडळ निवडून आले तेव्हा पासून आजवर सुमारे ४ वर्ष भराच्या कालावधीत नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने पतसंस्थेच्या सर्वांगीण विकास साठी सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे कामकाज चालविले आहे .
आपल्या पतसंस्थेने आता २६व्या वर्षात पदार्पण केले आहे .या २६ वर्षाच्या वाटचालीचा , विश्वासाचा व सहकार्याचा परिणाम म्हणजेच वाढलेले भाग भांडवल , ७ लाखांपर्यंत वाढलेली कर्ज मर्यादा व लाभांश वाटपाची वाढलेली टक्केवारी व सलग ४थ्या वर्षी ऑडिट वर्ग अ आहे .
२६वा वार्षिक अहवाल सादर करताना खूप आनंद होतो कि, आपल्या पतसंस्थेची भागभांडवल मर्यदा तरतूद १० कोटींपर्यंत वाढवण्यात अली असून , तशी मंजुरी पण मिळालेली आहे. ५ लाखांचा विमा काढूनच सभासदांना कर्ज दिले जाते . सहकार क्षेत्रातील नियमानुसार सातत्याने बदल करत आहोत दर वर्षी आर्थिक वातावरण आव्हानात्मक होत असल्यामुळे नियमाचे माप दंड अजूनच काटेकोर पणे करावे लागणार आहे . तरच पतसंस्थेची गुणवत्ता टिकून राहील. संचालक मंडळ सर्व नियमांच्या नियंत्रणात असलेल्या मर्यादा पाळूनच काम करत असून सभासदांचे सहकार्य मिळत आहे. संचालक मंडळाने सभासदांच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्यात फक्त कर्ज वाटप न करता सभासदांच्या भागभांडवलात वाढ कशी होईल ? सभासदांची बचत कशी होईल? हे कार्य सुद्धा संचालक मंडळ करत आहे .
आर्थिक अडचण सोडवण्यासाठी पतसंस्थेचा पर्यायी मार्गाबरोबर बचत म्हणून विचार प्रामुख्याने करावा. वेळोवेळी पतसंस्थेच्या विविध उपक्रमात भाग घेऊन सहकार्य करावे . आपण देत असलेल्या सततच्या पाठिंब्यामुळे पुढील आर्थिक वर्ष पुन्हा एकदा सर्वांगीण प्रगतीचे असेल. अशी संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही देतो .
संस्थेचा कारभार करत असताना पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , खजिनदार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळते. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सहकार क्षेत्रातील मान्यवर संस्थेच्या सम्पर्कातील व्यवस्थापक , लेखापरीक्षक , एम सॉफ्टवेअर सहकारी यांचे मनः पूर्वक आभार , सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ..
धन्यवाद ....
सौ. गौरी तुकाराम जाधव
सचिव
सहकार देवो भव..
प्रिय सभासद बंधू आणि भगिनींनो ,
आपल्या पतसंस्थेच्या नोंदणी पासूनच २६व्या वर्षाच्या ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या सहकारी वर्षातील आम्ही केलेल्या क्रमांकाचा आढावा असलेला अहवाल तसेच आर्थिक व्यव्हारा संबंधीच्या बाबींचा विस्तृत तपशील असलेला आर्थिक ताळेबंद व नफा तोटा पत्रक आपल्या सर्वांच्या माहितीसाठी व मान्यतेसाठी आपणा समोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. याही वर्षी आपली पतसंस्था आपणा सर्वांच्या सहकार्याने प्रगती पथावर आहे. बँकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे व कोरोनामुळे सगळीकडे व्यवसायिक वेग मंदावला असताना देखील आपल्या पतसंस्थेच्या भागभांडवला मध्ये वाढ झालेली आहे .तसेच कर्ज वाटप करून निव्व्ल नफ्यामध्येही वाढ झालेली आहे .
संस्थेने सभासदांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्यांतर्गत या वर्षी दीर्घ कर्ज मर्यादा ५ लकांवरून ७ लाख पर्यंत केली आहे . तसेच पतसंस्थेची भागभांडवल मर्यादा ५ कोटी वरून १० कोटी केली आहे . या आर्थिक वर्षात सभासदांना ७.५% लाभांश वाटप करण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे . पीसीईटी
कॉलेजचे सर्व विश्वस्त , सल्लागार , संचालक , व्यवस्थापक , व सभासद देत असलेल्या सततच्या पाठिंब्यामुळे पुढील आर्थिक वर्ष पुन्हा एकदा सर्वांगीण आर्थिक विकासाचे असेल, अशी मी ग्वाही देऊ इच्छिते .
धन्यवाद...
कु. मनोज बालासाहेब थोरात
खजिनदार
सन्माननीय सभासद बंधू भगिनी, विश्वस्त, सल्लागार, संचालक व हितचिंतक आपल्याशी संवाद
साधताना मला अतिशय आनंद होत आहे. सन १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आज सहकार क्षेत्रात स्वतः
चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या २६ वर्षाच्या सहप्रवासात प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. त्यामुळेच संस्थेचा
आर्थिक नफा वाढत आहे. याचाच फायदा म्हणून गेली चार वर्षे संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. या वर्षी
पतसंस्थेचे ३७० सभासद, ४.७५ कोटी भागभांडवल तसेच १० लाख राखीव निधी अशी दमदार वाटचाल पतसंस्थेने
केली आहे. या प्रवासात आपण सर्व सभासद आणि आपला विश्वास हाच प्रगतीचा खरा पाया आहे.कर्जदार सर्व
हितचिंतक, सल्लागार यांची मोलाची साथ नेहमीच लाभली आहे. आपल्या सर्वांचा विश्वास हा माझ्यासाठी अमूल्य
ठेवा आहे. पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्ज वसुली हा महत्वाचा भाग असतो , कर्ज वसुली कामी सर्व सभासद विविध
कॉलेज मधील प्रशासन व संबंधित अधिकारी यांचे नेहमीच सहकार्य मिळाले आहे सर्वांच्या सहकार्यामुळे दरवर्षी १००
टक्के कर्ज वसुली करणे झाले आहे. पतसंस्थेच्या या प्रगतीच्या उंचावलेल्या आलेखावर पीसीईटीचे सर्व विश्वस्त
आजी माजी सल्लागार संचालक व सभासद यांचे खूप मोलाचे योगदान लाभले आहे. यासर्वांचे मी मनापासून आभार
मानतो आणि आपल्या सर्वांकडून अशीच सहकार्याची नम्र पणे अशा व्यक्त करतो.
धन्यवाद...!