१. कर्ज थकीत राहिल्यास त्यास कर्जदार व जामिनदार जबाबदार राहतील.
२. एका सभासदास दोनपेक्षा जास्त सभासदांना जामिनदार राहता येणार नाही .
३. अस्थायी (temporary)सभासदांना त्यांच्या शेअर्स रकमेच्या १०० टक्के कर्ज मिळेल .
कर्ज रकमेतून १० टक्के शेअर्स वजा केले जाणार नाहीत .
४. रु. ५ लाख कर्ज फक्त कायम स्वरूपी (permanent)कार्यरत असणाऱ्या सभासदांना मिळेल पण त्यांचा
पगार रु. १७००० च्या पुढे असला पाहिजे.
५. रु.७ लाख कर्ज हवे असल्यास अशा सभासदांचा पगार रु २४००० असणे व सभासदांची शेअर्स रक्कम रु २ लाख
असणो आवश्यक आहे
६. सर्वसाधारण कर्ज घेतेना सभासदांचा विमा असणे आवश्यक आहे. पतसंस्थे तर्फे group insurance काढणे
किंवा रु ५ लाख sum assured काढून पोलिसी पतसंस्थेला assign करावी लागेल .
७. जे सभासद राजीनामा देतील त्यांना पुढे सभासद झाल्यास २ वर्षे कर्ज मिळणार नाही.
८. जे सभासद राजीनामा देतील ते सभासद पुढील ६ महिने परत सभासद होऊ शकत नाहीत .
९. नविन सभासदांना १ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच फक्त तातडीचे कर्ज मिळेल .
सर्व साधारण कर्ज हवे असल्यास त्यांची शेअर्स रक्कम १ लाख असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सभासत्वाचा
कालावधी २ वर्षे पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
१०. जर एकाच वेळेस टॉप अप आणि प्रथमच कर्ज घेणारे असल्यास प्राधान्य हे प्रथमच कर्ज घेणाऱ्याला मिळेल .
११. टॉप अप करणाऱ्या सभासदाने प्रथम कर्जाच्या ५० टक्के रकमेची पूर्तता केल्यानंतरच नविन कर्ज देण्यात
येईल.
१२. २ लाख शेअर्स झाल्यानंतर कर्ज घेताना शेअर्स कटिंग करण्यात येणार नाही.
१३. वरिल नियम व अटी बदलण्याचा अधिकार सर्वस्वी संचालक मंडळाला राहील .
अध्यक्ष /सचिव/ खजिनदार
पिंपरी चिंचवड एज्यु ट्रस्ट कर्मचारी सहकारी
पतसंस्था मर्यादित.
प्राधिकरण निगडी पुणे ४११०४४.