कुठलीही नवंनिर्मिती माणसाच्या गरजेतून उपजते आणि गरजेची पूर्तता हि आर्थिक स्थरातून पूर्ण केली जाते .यात सर्वच असतात सर्वसाधारण कर्मचारी आवर्जून मोडतात . पिंपरी चिंचवड पॉलिटेकनिक कॉलेज याला अपवाद नव्हते म्हणूनच पतपेढीची स्थापना करण्याची मुख्य उद्दिष्ट होती. तळागाळाच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करणे, त्यांचा विकास करणे ,त्यांना सहकाराचे महत्त्व पटवून देणे , त्यांना बचत करण्यास प्रवृत्त करणे व त्यांना कर्ज रूपाने मदत करणे .
एकेदिवशी हि बाब प्राचार्य श्री जी एम देशमुख सरांच्या लक्षात आली. श्री ए. यु . शेख , श्री डी. बी . सोरटे, श्री एस. व्ही. रायपुरे व श्री एस. एच. शेख यांना वैद्यकीय खर्चासाठी व लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे हे सर्व मा. प्राचार्य जी.एम.देशमुख सरांना भेटले व कॉलेजनी आम्हाला पैशांची मदत करावी अशी विनंती केली. प्राचार्यांनी हि गोष्ट संस्थेचे त्यावेळेचे अध्यक्ष मा. कै शंकरराव बाजीराव पाटील , उपाध्यक्ष मा.श्री ज्ञानेश्वरजी लांडगे , सचिव मा. श्री विठ्ठलराव काळभोर व खजिनदार मा. श्री शांताराम गराडे यांना सांगितली . त्यावेळी संस्था चालकांनी सरांना या संदर्भात कर्मचाऱ्यांनी आपली पतसंस्था काढावी असे सुचवले. मग देशमुख सरांनी पतसंस्थेच्या स्थापन करण्यासाठी श्री आर . बी. साळुंके सरांना माहिती गोळा करायला सांगितली व साळुंके सरांनी रीतसर मान्यता आणून आपली पतसंस्था स्थापन केली .
त्यानुसार कर्मचाऱ्यांकडून दरमहा पगारातून ५०/-रु , ७५/- रु , १००/- रु भागभांडवल घेऊन व प्राचार्यांच्या ठेव रकमेवर कर्मचाऱ्यांना रितसर कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. साधारणपणे ५७ सभासदांकडून जमा झालेली साधारण ३०००/- रु रक्कम कर्ज स्वरूपात पहिल्यांदा श्री संजय व्ही रायपुरे यांना त्यांच्या होऊ घातलेल्या लग्नासाठी देण्यात आले व दुसऱ्यांदा १५००/- रु रक्कम ही श्री एस. एच. शेख यांना वैद्यकीय कारणासाठी देण्यात आली.
सभासदांना बचतीची सवय लावणे , त्यांच्या गरजा भागातील इतपत कर्ज देणे व वेळेवर त्या कर्जाची वसुली करणे ह्या तीन गोष्टी म्हणजे पतपेढी आत्मा आहे. याला उज्ज्वल भवितव्य आहे. सहकाराची ज्योत तेवत ठेवण्याची प्रत्येकाची भावना आहे. कर्मचाऱ्यांना सुखी व संपन्न करण्याची जिद्द आहे. यातून आपले उत्कर्ष साधता येणार आहे. आपले जिवन सहकारमय बनवता येईल व श्रमाचे सार्थक होईल . या भावनेतून स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड पॉलिटेकनिक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितच पहिले संस्थापक संचालक मंडळ
खालील प्रमाणे :-
१) श्री जी. एन. देशमुख - अध्यक्ष
२) श्री बी. व्ही माने - उपाध्यक्ष
३) श्री आर. बी साळुंके - सचिव
४) श्री एस. एस. देव - उपसचिव
५) कु डी. जी. कांबळे - खजिनदार
६) श्री सी. एन. कुलकर्णी - का. सदस्य
७) श्री एम. एस . पवार - का. सदस्य
८) श्री एस. पी. चाफळकर - का. सदस्य
९) सौ आर.जे. चौधरी - का. सदस्य
१०) सौ ए. एस. काळे - का. सदस्य
११) श्री डी. बी. सोरटे - का. सदस्य
संस्थापक संचालक मंडळ सोडून पण पतसंस्थेच्या पुढच्या यशस्वी वाटचाली मध्ये पी सी इ टी चे सर्व विश्वस्त ,डॉ विद्या ब्याकॉड , सौ अनुजा कामठे , डॉ अजय फुलंबरकर , श्री शाहूराज कदेरे, श्री मल्हारी काळभोर , श्री निवृत्ती लांडगे, सर्व संचालक मंडळ तसेच अनेक सभासदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पतसंस्थेच्या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे म्हणून असे म्हणता येईल कि , शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्यासाठी कोणीतरी एक होऊन शुन्यापुढे उभे राहण्याची दाखवावी लागते हिम्मत. मग अशीच हिम्मत १९९६ साली दाखवीत शून्य अवस्थेत असलेली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित निगडी स्थापन करून त्यात जीव ओतत हे रोपटं हळू हळू आपला विश्वास सभासदांच्या मनात रुजवत चाललेली आहे.
ह्या पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ह्या शुभेच्छा देऊन आपण सर्वांचे असेच सहकार्य व मार्गदर्शन लाभावे.